मराठी सक्तीविरोधात चार उबर चालकांची मुंबई हायकोर्टात धाव
मुंबई : रिक्षा, टॅक्सी आणि ॲप-आधारित कॅब चालकांसाठी मराठी भाषेची सक्ती करणाऱ्या १२ ऑगस्टच्या अधिसूचनेला चार उबर चालकांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. संबंधित अधिसूचना रद्द करून त्याला स्थगिती देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
या नियमामुळे राज्यातील सुमारे साडेनऊ लाख चालकांच्या रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता असून, चालकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.
या जनहित याचिकेवर बुधवार, २६ ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे न्यायालय या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे रिक्षा, टॅक्सी आणि ॲप-आधारित कॅब चालकांचे लक्ष लागले आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
Views: 25







