अखिल भारतीय रेडिओ श्रोता संमेलनात अहिल्यानगरच्या श्रोत्यांचा छत्तीसगड, भिलाईत सन्मान..

टाकळीभान (प्रतिनिधी) : छत्तीसगडमधील भिलाई-दुर्ग येथे रेडिओ श्रोता दिनानिमित्त आयोजित दोन दिवसीय अखिल भारतीय रेडिओ श्रोता संमेलनात अहिल्यानगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील रेडिओ श्रोत्यांचा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. भिलाई दुर्ग येथील महात्मा गांधी चित्र मंदिर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे झालेल्या या संमेलनात श्रीरामपूर-भोकर येथील पत्रकार हरिभाऊ बिडवे, खुपटी-नेवासा येथील बंडू लोहार ‘पोपळघट’, काष्टी-श्रीगोंदा येथील लक्ष्मण जगताप, सालवडगाव-शेवगाव येथील किरण वीर, पाथर्डीचे अंबादास शिंदे तसेच संभाजीनगरचे राजेश साबळे पाटील यांना ट्रॉफी, मेडल, प्रमाणपत्र व २०२६ लिस्नर्स अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
आकाशवाणीच्या विविध कार्यक्रमांचे उत्कृष्ट रिपोर्टिंग केल्याबद्दल जेष्ठ श्रोते लक्ष्मण जगताप, बंडू लोहार ‘पोपळघट’, राजेश साबळे पाटील, हरिभाऊ बिडवे, किरण वीर, संतोष एस. काळे, पी. एस. न्हावकर आदींचा उत्कृष्ट रिपोर्टर व रेडिओ श्रोता म्हणून गौरव करण्यात आला.
या संमेलनाला महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, कर्नाटक, दिल्ली आदी विविध राज्यांतील ६०० हून अधिक रेडिओ श्रोते उपस्थित होते. विविध भारती, ऑल इंडिया रेडिओ रायपूर, अंबिकापूर, जगदलपूर व जबलपूर येथील कार्यक्रम अधिकारी, निवेदक व सादरकर्त्यांनी उपस्थित राहून श्रोत्यांना मार्गदर्शन केले.
संमेलनाचे प्रमुख पाहुणे दुर्गचे खासदार विजय बघेल, आमदार गजेंद्र यादव, विविध भारती मुंबईचे संचालक डॉ. संतोष जाधव तसेच रायपूरचे भाजपा प्रदेश कार्यालय प्रभारी मंत्री अशोक बजाज उपस्थित होते. अध्यक्षस्थानी भिलाई श्रोता संघाचे अध्यक्ष व राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक परसराम साहू होते. यावेळी शालेय विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. छत्तीसगडी संस्कृतीवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. रेडिओ श्रोत्यांनी रेडिओचे पूजन करून मिरवणूक रॅली काढली. रॅलीत श्रोत्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी विविध भारतीचे केंद्र निदेशक . डॉ. संतोष जाधव यांना निवेदन देऊन विविध भारती केंद्रावरील पूर्वीप्रमाणे सर्व फर्माईशी कार्यक्रम सुरू करण्याची मागणी केली.
संमेलनासाठी महाराष्ट्रातील मास्टर एस. के. पाटील, जगन्नाथ बसैये, राजेश साबळे पाटील, बंडू लोहार ‘पोपळघट’, उत्तमकुमार जमधाडे, शाहजी बोडखे, हरिभाऊ बिडवे, किरण वीर, अंबादास शिंदे, संतोष एस. काळे, राजू माटे, बाळासाहेब सोलनकर, अल्ताफ हुजरे, विनायक धनेश्वर, मोहन निवारे, हिरामन खिराडे, संजुभाऊ, सिद्धार्थ गोंडाणे, हिरामन शेंडे, राजेंद्र मिसाळ, नरेंद्र नरवाडे, शब्बीर हुसेन, राजेश खोबरखेडे, सहदेव दामोदर, नारायण हागे, किशन सपकाळ, विठ्ठल सुरोशे, अमोल इंगळे, श्रीकृष्ण बाठे, संजय पाटील, चांगदेव चव्हाण, नारायण गायकवाड, रमेश गाठोडे, अनिता गाठोडे, आत्माराम पाटील यांच्यासह देशभरातील अनेक रेडिओ श्रोते उपस्थित होते.
संमेलन यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष परसराम साहू गुरुजी, अशोक शामकुवर, मुकेश शर्मा, तारक सतदेव, झावेंद्रकुमार ध्रुव यांच्यासह रेडिओ श्रोता टीमने विशेष परिश्रम घेतले. या सन्मानामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील रेडिओ श्रोत्यांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेल्याने जिल्ह्यातील रेडिओ प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर







