मिरा रोडमध्ये बकरी आणण्यावरून गृहसंकुलात वाद; डुकरामुळे तणाव वाढला, पोलिसांनी परिस्थिती हाताळली
मिरा रोड:
मिरा रोड येथील पुनम क्लस्टर गृहसंकुलात बकरी ईदसाठी बकऱ्या आणल्याच्या कारणावरून सोमवारी रात्रीपासून मोठा वाद निर्माण झाला आहे. दोन गटांतील बाचाबाचीदरम्यान एका व्यक्तीवर ब्लेडने हल्ला झाल्याच्या आरोपांनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या वादाचे पडसाद मंगळवारीही पाहायला मिळाले. हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी संकुलात हनुमान चालीसा पठण करत घोषणाबाजी केली. दरम्यान, काही कार्यकर्त्यांनी संकुलात डुक्कर नेण्याचा प्रयत्न केला, मात्र उपस्थित पोलिसांनी सतर्कता दाखवत हा प्रयत्न हाणून पाडला.
परिस्थिती अधिक बिघडू नये यासाठी पोलिसांनी तातडीने मध्यस्थी केली. अखेर, संकुलातील बकऱ्या बाहेर नेण्यासाठी वाहने बोलावण्यात आली असून, सध्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शांतता राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
पत्रकार: उमेश कुलकर्णी
मोबाईल नं: 9822548429










