दोन जीव घेऊन सेलिब्रेशन; मृताच्या वडिलांचा संताप — पुणे पोर्शे अपघात प्रकरण
पुणे — पोर्शे अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल अग्रवाल आणि त्यांच्या पत्नीला जामीन मिळाल्यानंतर त्यांचे स्वागत करत नाचणारा आणि नोटांचे हार घालणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून अपघातात मृत्यू झालेल्या अश्विनी कोष्टा यांचे वडील सुरेश कोष्टा यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
सुरेश कोष्टा म्हणाले, “दोन निष्पाप लोकांचा जीव घेऊन अशा प्रकारे आनंद साजरा करणे ही कदाचित त्यांच्या समाजातील प्रथा असावी. जामिनावर सुटल्यावर अशा प्रकारे पार्टी करणे ही सर्वसामान्यांची क्रूर थट्टा आहे.” आरोपींच्या या वर्तनामुळे पीडित कुटुंबात न्यायाबद्दल मोठी नाराजी पसरली आहे.
सुरेश कोष्टा आणि इतर पीडितांनी प्रशासनाकडे आरोपींचा जामीन तात्काळ रद्द करून त्यांना पुन्हा तुरुंगात टाकण्याची मागणी केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तातडीने व्हायरल झाला असून, श्रीमंत आरोपींना मिळणाऱ्या विशेष वागणुकीवर लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
पत्रकार: उमेश कुलकर्णी
मोबाईल: 9822548429










