स्वातंत्रवीर विनायक (तात्याराव) दामोदर सावरकर जयंती — आदराने वंदन!
सूर्यसदृश उष्णता, वायुसदृश तीव्रता, खडकासम धैर्य आणि बृहस्पतीसदृश बुद्धिमत्ता लाभलेले युगपुरुष म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.
जहाल सशस्त्र क्रांतिकारक, प्रखर देशभक्त, समाजसुधारक, महाकवी, साहित्यिक, नाटककार, हिंदुत्ववादी विचारवंत आणि मराठी भाषाप्रेमी म्हणून त्यांनी राष्ट्रजीवनाला दिलेले योगदान अतुलनीय आहे. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे निर्भय क्रांतिकार्य, समाजसुधारणेसाठी केलेले प्रयत्न आणि साहित्य-सामाजिक क्षेत्रातील कार्य भारतीय इतिहासात अजरामर आहे.
सावरकरांनी आपल्या विचारांनी, लेखनाने आणि राष्ट्रभक्तीच्या तेजस्वी भूमिकेने असंख्य तरुणांना प्रेरणा दिली. त्यांच्या विचारांची प्रखरता, साहित्यिक प्रतिभा आणि समाज परिवर्तनाचा ध्यास आजही प्रेरणादायी आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक (तात्याराव) दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम!
लोक 1 न्युज










