पुण्यातील आयटी अभियंत्याची आत्महत्या; सुसाईड नोटच्या आधारे तिघांविरुद्ध गुन्हा
पुणे :पुण्यातील हिंजवडी परिसरातील एका नामांकित आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या अभियंत्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अमित ब्राम्हे (वय ४८) असे मृत व्यक्तीचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या कथित सुसाईड नोटमध्ये त्यांनी काही व्यक्तींकडून होत असलेल्या मानसिक त्रासाचा उल्लेख केला असल्याचे सांगितले जात आहे. या नोटच्या आधारे भोसरी पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, प्रकरणाचा तपास सुरू असून सुसाईड नोट, डिजिटल पुरावे आणि इतर संबंधित बाबींची पडताळणी करण्यात येत आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेमागील नेमकी कारणे स्पष्ट होणार आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे आयटी क्षेत्रात खळबळ उडाली असून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, चौकशी आणि तपास प्रक्रिया सुरू असल्याने कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरविण्याबाबत अंतिम निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही.
या प्रकरणाचा पुढील तपास भोसरी पोलीस करत आहेत.
पत्रकार : उमेश कुलकर्णी
मो. 9822548429




