जाफ्राबाद आगाराचे दिपक डिघोळे यांच्या प्रामाणिकपणा चे प्रवाशांना घडले दर्शन:-


जाफ्राबाद आगाराचे दिपक डिघोळे यांच्या प्रामाणिकपणा चे प्रवाशांना घडले दर्शन:-

जि. जालना:ता.जाफ्राबाद:दि. 15 जून :- दिनांक १५ जुन रोजी सकाळी जाफराबाद आगारातून नियमित जाफ्राबाद ते जालना बस क्र. 8969 फेरीसाठी निघाली. आणि याच बस मध्ये जाफराबाद येथुन बसलेल्या प्रवासी सौ. अनिता काकडे व त्यांचा मुलगा शिवम गजानन काकडे ( रा.भोसा.ता.चिखली.जि.बुलढाणा)हे शाळेची फी भरण्यासाठी जालना येथे जात असताना, त्यांची ४५००० / हजार रुपये रक्कम असलेली बॅग गाडीमध्येच उतरतांना विसरली. त्यानंतर सर्व प्रवासी उतरून गेल्याच्या नंतर वाहक श्री दीपकराव डिघोळे हे बसची नियमित तपासणी करताना त्यांनाही बॅग सीटाच्या बाजूला पडल्याची आढळले.

त्यांनी ती बॅग उचलून जवळ घेतली त्यानंतर काही वेळातच ती प्रवासी महिला व त्यांचा दहा वर्षाचा मुलगा हे रडत रडत बस कडे धावत आले व जोरजोराने ओरडत विचारू लागले . की , आमची बॅग हरवली आहे . कोणाला दिसली का ? त्याचवेळी वाहक श्री डिघोळे यांनी त्यांना धीर देत ४५ हजार रुपयाची बॅग त्यांना इनामदारीपूर्वक वापस केली.

महिला प्रवासी व त्यांचा मुलगा रडत रडत वाहक श्री.डिघोळे यांचे आभार मानत होते. अशा प्रकारचा हा प्रामाणिकपणा आज कमी प्रमाणात दिसून येतो.

परंतु या सर्व बाजूंनी बस वाहक श्री दिपक डिघोळे यांच्या प्रामाणिकपणा व इमानदारी दिसून आली.

यावरून असे दिसून येते, एसटी सेवा म्हणजे केवळ प्रवासी सेवा नाही, तर विश्वास आणि प्रामाणिक पणाची जबाबदारी चे नाते असलेल्यचे दिपक डिघोळे यांच्या प्रामाणिकपणा वरुन पुन्हा एकदा राज्य परिवहन महामंडळाचे नाव लौकिक करून दिल्याने , वाहक दिपक डिघोळे सर्वत्र कौतुक होत आहे.

पत्रकार :-विजय रणभोर, पुणे.
9359280220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!