बनावट दूध हटणार, शेतकऱ्यांचा फायदा होणार : FDA आयुक्त तुकाराम मुंढे:-


बनावट दूध हटणार, शेतकऱ्यांचा फायदा होणार : FDA आयुक्त तुकाराम मुंढे:-

बांबवडे :दि. 23 जून :-राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी महत्त्वपूर्ण माहिती अन्न व औषध प्रशासन (FDA) चे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे. “दुधाचे दर वाढवणे थेट आपल्या हातात नसून ते खुल्या बाजारव्यवस्थेवर अवलंबून असते,” असे स्पष्ट करत त्यांनी बाजारातील बनावट आणि भेसळयुक्त दुधाविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मते, बाजारातील बोगस आणि भेसळयुक्त दूध पूर्णपणे बंद करण्यात यश आले, तर नैसर्गिक व शुद्ध दुधाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढेल. परिणामी, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला आणि योग्य दर मिळण्यास मदत होईल.

अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यभर अन्नपदार्थ आणि दुधातील भेसळ रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. बनावट दूध बाजारातून हद्दपार झाल्यास ग्राहकांना शुद्ध दूध उपलब्ध होईल आणि त्याचा थेट आर्थिक फायदा कष्टकरी शेतकऱ्यांना होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

FDA च्या या भूमिकेमुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आशावादाचे वातावरण निर्माण झाले असून, भेसळमुक्त दूधव्यवस्थेमुळे ग्राहकांचा विश्वास वाढून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पत्रकार :विजय रणभोर, पुणे.
9359280220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!