बोगस डॉक्टरांना जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईचा फटका :-
सांगली:दि. 23 जून :-सांगली जिल्ह्यात बोगस वैद्यकीय प्रॅक्टिसच्या वाढत्या तक्रारींची जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आहे. जिल्हा व महापालिका प्रशासनाला तातडीने सर्वेक्षण करून १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वैद्यकीय पदवी किंवा अधिकृत शिक्षण नसताना आयुर्वेदिक, होमिओपॅथिक किंवा इतर उपचार करणाऱ्यांवरही बोगस डॉक्टर म्हणून कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, एका पॅथॉलॉजी लॅबमध्ये तंत्रज्ञाने चुकीचा एचआयव्ही पॉझिटिव्ह रिपोर्ट दिल्याचे चौकशीत उघड झाल्यानंतर संबंधित तंत्रज्ञ व डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृष्णा साठे यांच्या पाठपुराव्यानंतर जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम आणि महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुचिता पवार यांना बोगस डॉक्टरांवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पत्रकार :विजय रणभोर, पुणे.







