हेडलाईन: येरवडा पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्याविरोधात समस्त हिंदू आघाडीची गंभीर तक्रार; चौकशीची मागणी
पुणे: येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्याविरोधात समस्त हिंदू आघाडीच्या वतीने गंभीर आरोप करत तक्रार दाखल करण्यात आली आहे. संघटनेने हिंदू नागरिकांशी जातीय भेदभाव केल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
समस्त हिंदू आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत पोलीस निरीक्षकांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. कर्तव्य बजावताना हिंदू नागरिकांशी दुजाभाव केला जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला असून, त्यांच्यावर इतरही काही गंभीर आरोप करण्यात आल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
या प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून निष्पक्ष व सखोल चौकशी करून, आरोप सिद्ध झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी समस्त हिंदू आघाडीने केली आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429




