मुसळधार पावसामुळे नालासोपारा रेल्वे स्थानक परिसर जलमय; लोकल सेवा सुमारे तासभर उशिराने
नालासोपारा: सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नालासोपारा रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. रेल्वे रुळांजवळ आणि स्थानक परिसरात पाणी साचल्याने पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून गाड्या सुमारे एक तास उशिराने धावत आहेत.
या परिस्थितीमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून अनेक स्थानकांवर गर्दी वाढली आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासाचे नियोजन परिस्थितीनुसार करण्याचे आवाहन केले आहे.
पावसाचा जोर कायम असल्याने परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष असून अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.
पत्रकार सिंथिया कोरिया
Views: 77








