E20 पेट्रोलबाबत सरकारचे मोठे स्पष्टीकरण; अफवांवर पडदा, वापर सुरक्षित असल्याचा दावा


E20 पेट्रोलबाबत सरकारचे मोठे स्पष्टीकरण; अफवांवर पडदा, वापर सुरक्षित असल्याचा दावा

नवी दिल्ली : E20 (२० टक्के इथेनॉल मिश्रित) पेट्रोलच्या वापराबाबत सोशल मीडियावर पसरत असलेल्या विविध अफवा आणि गैरसमजांवर केंद्र सरकारने महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी सरकारने १० प्रमुख मुद्द्यांद्वारे E20 पेट्रोलबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे.
सरकारच्या म्हणण्यानुसार, E20 पेट्रोलमुळे वाहनाच्या इंजिनवर किंवा मायलेजवर कोणताही मोठा अथवा नकारात्मक परिणाम होत नाही. हे इंधन बाजारात आणण्यापूर्वी आवश्यक त्या सर्व चाचण्या करण्यात आल्या असून, हा कोणताही प्रयोगात्मक उपक्रम नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
याशिवाय, E20 पेट्रोलचा वापर केल्याने वाहनाची वॉरंटी किंवा विमा (इन्शुरन्स) यावर कोणताही परिणाम होत नाही. ग्राहकांचे विमा दावे आणि वॉरंटीचे लाभ पूर्वीप्रमाणेच लागू राहतील, असे सरकारने म्हटले आहे.
इथेनॉल उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात पाणी वापरले जाते किंवा E20 पेट्रोलमध्ये पाणी व साखर मिसळली जाते, त्यामुळे वाहनांकडे मुंग्या आकर्षित होतात, अशा दाव्यांनाही सरकारने फेटाळून लावले आहे. हे सर्व दावे निराधार आणि दिशाभूल करणारे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सरकारच्या माहितीनुसार, E20 पेट्रोलच्या वापरामुळे वाहनांमधून होणारे प्रदूषण कमी होण्यास मदत होते. तसेच कच्च्या तेलावरील आयातीवरील अवलंबित्व कमी होऊन परकीय चलनाची बचतही होते.
यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा आणि E20 पेट्रोलचा वापर निर्धास्तपणे करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!