कृषी संगिनी समूहातर्फे रावे (RAWE) कार्यक्रमांतर्गत स्वयं-सहाय्यता बचत गटांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन:-
जि. रायगड :दी. 3 जुलै :-रावे (RAWE) कार्यक्रमांतर्गत कृषी संगिनी समूहाने गावातील स्वयं-सहाय्यता बचत गटातील महिलांशी संवाद साधून त्यांना स्वयंरोजगार व लघुउद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहित केले. महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्यक्ष भांडवली गुंतवणूक, आर्थिक नियोजन, उपलब्ध शासकीय योजना, उत्पादनाची निवड आणि विपणन याविषयी माहिती देण्यात आली. तसेच स्थानिक पातळीवर उपलब्ध संसाधनांचा उपयोग करून कमी भांडवलातही व्यवसाय सुरू करता येतो, याबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली.
यावेळी महिलांना बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन साधण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. नियमित बचत, सामूहिक प्रयत्न आणि योग्य नियोजन यांच्या बळावर यशस्वी उद्योजक बनता येते, असा संदेश देण्यात आला. या उपक्रमामुळे महिलांमध्ये उद्योग सुरू करण्याविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला असून त्यांनी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.








