पुण्यात लिव्ह-इन पार्टनरवर चाकूने प्राणघातक हल्ला; २ वर्षांच्या मुलीचे अपहरण, आरोपी अटकेत
पुणे : खेड तालुक्यातील आंबेठाण येथे लिव्ह-इन रिलेशनशिपमधील वादातून एका तरुणाने आपल्या लिव्ह-इन पार्टनरवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. हल्ल्यानंतर आरोपीने महिलेच्या दोन वर्षांच्या मुलीचे अपहरण करून पळ काढला. या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव चांगदेव मुंडे असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून पीडित महिला त्याच्यापासून विभक्त होऊन वेगळी राहत होती. याच रागातून १ जुलै रोजी आरोपीने महिलेच्या घरात घुसून तिच्यावर चाकूने वार केले. महिला गंभीर जखमी झाल्यानंतर त्याने तिच्या दोन वर्षांच्या मुलीला घेऊन पलायन केले.
घटनेची माहिती मिळताच महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून आरोपीचा शोध घेतला आणि त्याला अटक केली. अपहरण करण्यात आलेल्या चिमुरडीची सुरक्षित सुटका करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429








