नालासोपाऱ्यात नालेसफाई कामांमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप; पावसामुळे शहर जलमय:-
मुंबई :दी 5 जुलै :-वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील नालासोपारा शहरात नालेसफाईच्या कामांमध्ये ठेकेदारांकडून कथितपणे कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहेत. आज झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, नाळेसफाईसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो. मात्र प्रत्यक्षात अनेक नाले गाळाने भरलेले असून प्रभावी साफसफाई झालेली दिसून येत नाही. परिणामी, मुसळधार पावसात पाणी वाहून जाण्याऐवजी रस्ते, घरे आणि दुकाने पाण्याखाली जात असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे.
या परिस्थितीमुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान होत असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच साचलेल्या पाण्यामुळे आरोग्याच्या समस्याही निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नाळेसफाईच्या कामांची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदारांची जबाबदारी निश्चित करावी, तसेच दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, यासंदर्भात वसई-विरार शहर महानगरपालिकेची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.






