वडगाव मावळात पावसाचा कहर; गावातील रस्त्यांना नदीचे स्वरूप, जनजीवन विस्कळीत
वडगाव मावळ (प्रतिनिधी):
सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वडगाव मावळ शहरातील अनेक रस्त्यांना अक्षरशः नदीचे स्वरूप आले आहे. पावसाचे पाणी मोठ्या वेगाने रस्त्यावरून वाहत असल्याने वाहनचालक आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
समोर आलेल्या दृश्यांमध्ये रस्त्यावरून प्रचंड वेगाने चिखलमिश्रित पाणी वाहताना दिसत असून काही वाहने पाण्यात अडकली आहेत. अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
पावसाचा जोर कायम असल्याने सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष असून आवश्यक त्या उपाययोजना सुरू आहेत.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429






