चिंचवड पुलावरून पाणी; बिर्ला हॉस्पिटल–चिंचवड मार्ग वाहतुकीसाठी बंद


चिंचवड पुलावरून पाणी; बिर्ला हॉस्पिटल–चिंचवड मार्ग वाहतुकीसाठी बंद

चिंचवड पुलावरून पाणी वाहू लागल्याने मार्ग बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय
पिंपरी-चिंचवड परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पवना नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून चिंचवड येथील पुलावरून पाणी वाहू लागले आहे. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून बिर्ला हॉस्पिटल ते चिंचवड पूल दरम्यानची वाहतूक तातडीने बंद केली आहे.
पुलावरून पाणी वाहू लागल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी संबंधित मार्गावर बॅरिकेड्स उभारून सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक थांबवली आहे. पोलिसांकडून परिसरात सतत गस्त घालण्यात येत असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
दरम्यान, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी नदीपात्र, पूल आणि पूरग्रस्त भागात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
वाहनचालकांनी बिर्ला हॉस्पिटल ते चिंचवड पुलाचा वापर टाळून पर्यायी मार्गांचा अवलंब करावा. तसेच, अत्यावश्यक कामाशिवाय पूरस्थिती असलेल्या भागात प्रवास करू नये आणि प्रशासन व पोलिसांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!