ऊसतोड मजुराच्या मुलाची ह्युंडाई कंपनीत मोठी झेप; जतच्या सिद्धार्थ पॉलिटेक्निकच्या शिवराज वगरेचे यश!


ऊसतोड मजुराच्या मुलाची ह्युंडाई कंपनीत मोठी झेप; जतच्या सिद्धार्थ पॉलिटेक्निकच्या शिवराज वगरेचे यश!

जत : जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर ग्रामीण भागातील मुले कोणतीही गोष्ट साध्य करू शकतात, हे जत तालुक्यातील वळसंग (गांधीनगर) येथील एका तरुणाने सिद्ध केले आहे.येथील ऊसतोड मजूर श्री.महादेव जोतिबा वगरे यांचे चिरंजीव शिवराज महादेव वगरे यांची पुणे येथील नामांकित ‘ह्युंडाई मोटर इंडिया लिमिटेड’ या ऑटोमोबाईल कंपनीत चांगल्या पॅकेजवर निवड झाली आहे.

शिवराज हा जत येथील सिद्धार्थ पॉलिटेक्निक (श्री उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाउंडेशन) या महाविद्यालयात ‘इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग’चे शिक्षण घेत आहे. नुकत्याच झालेल्या कॉलेज कॅम्पस प्लेसमेंटमध्ये (बॅच २०२६-२७) त्याची तळेगाव (पुणे) येथील ह्युंडाई कंपनीत निवड झाली आहे.

शिवराज सोबतच त्याचा वर्गमित्र हरीश शिवप्पा काटे याचीही या पदशक्तीसाठी निवड झाली आहे.प्रतिकूल परिस्थितीवर मात करत व वडिलांचे छत्र आणि ऊसतोडणीचे अत्यंत खडतर कष्ट पाहत शिवराजने आपले शिक्षण पूर्ण केले.

घरची परिस्थिती बेताची असतानाही त्याने अभ्यासातील सातत्य सोडले नाही.त्याच्या या यशाने वळसंग गावासह संपूर्ण जत तालुक्याची मान अभिमानाने उंचावली असून, ग्रामीण भागातील इतर विद्यार्थ्यांसाठी तो एक मोठा आदर्श ठरला आहे.या दैदिप्यमान यशाबद्दल सिद्धार्थ पॉलिटेक्निकच्या प्राचार्या सौ. वाग्गोली आर.जी., ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर श्री.शिंदे एस. डी., महाविद्यालयाचे चेअरमन, सचिव,संचालक आणि सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी शिवराजचे जाहीर अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

पत्रकार : संजय कोळी.जत
७८७५९०३७७७.


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!