शिवाजीनगर-घरकुल (हुडको) परिसरात महापालिकेची स्वच्छता मोहीम सुरू


शिवाजीनगर-घरकुल (हुडको) परिसरात महापालिकेची स्वच्छता मोहीम सुरू

जळगाव : छत्रपती शिवाजीनगर-घरकुल (हुडको) परिसरात आज, दि. 10 जुलै रोजी जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे तसेच स्थानिक नगरसेवकांच्या पुढाकाराने विशेष स्वच्छता मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. परिसरातील रस्ते, नाल्या आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करून नागरिकांना स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली.
या स्वच्छता मोहिमेच्या पाहणीवेळी जळगाव शहर महानगरपालिकेचे समीर बोरवले, नगरसेवक विजय बांदल, सामाजिक कार्यकर्ते विजय जगताप तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. नियमित स्वच्छता आणि नागरिकांच्या सहभागातून परिसर अधिक स्वच्छ, निरोगी व सुंदर राहील, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

प्रतिनिधी सोमेश मुळे

 


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!