स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे शिष्यवृत्ती उपक्रम जाहीर


स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे शिष्यवृत्ती उपक्रम जाहीर

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी नागरिकांना मदतीचे आवाहन; १५० हून अधिक विद्यार्थ्यांना मिळतो लाभ

निगडी, पुणे : आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, या सामाजिक बांधिलकीतून स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, निगडी यांच्या वतीने यंदाही ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शिष्यवृत्ती – २०२६’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे हे पाचवे वर्ष असून, गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी मंडळाने नागरिकांना सढळ हाताने आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
मंडळाच्या वतीने दरवर्षी आर्थिक अडचणींमुळे शालेय शिक्षणाचा खर्च पेलणे कठीण असलेल्या १५० हून अधिक विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी भरली जाते. या सामाजिक उपक्रमासाठी दरवर्षी चार लाख रुपयांहून अधिक निधी खर्च करण्यात येतो.
गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवणे, त्यांना आर्थिक आधार देणे आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. अधिकाधिक गरजू विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी मंडळाने दानशूर नागरिक, सामाजिक संस्था आणि शिक्षणप्रेमींनी आर्थिक मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन केले आहे.
💐 आर्थिक मदतीसाठी बँक तपशील
खातेदाराचे नाव : Swatantryveer Savarkar Mandal
बँकेचे नाव : TJSB Sahkari Bank, Nigdi
खाते क्रमांक : SB040110100014035
IFSC कोड : TJSB0000040
📍 संपर्क कार्यालय
स्वातंत्र्यवीर सावरकर सदन, सेक्टर २५, प्राधिकरण, निगडी, पुणे – ४११०४४.
संपर्क क्रमांक : ८४४६४२२१६५
गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिलेली छोटीशी मदतही त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते. त्यामुळे या सामाजिक कार्यात नागरिकांनी सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला बळ द्यावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी
मो. ९८२२५४८४२९


66
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!