वायसीएम रुग्णालयाच्या शवविच्छेदन विभागात कथित दारू पार्टी!


वायसीएम रुग्णालयाच्या शवविच्छेदन विभागात कथित दारू पार्टी!

मृत्यूचा दाखला घेण्यासाठी आलेल्या नागरिकाने व्हिडिओ केला; रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाच्या शवविच्छेदन विभागातील कथित दारू पार्टीचा व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. टेबलावर दारूची बाटली, ग्लास, खाद्यपदार्थ आणि जेवणाचे ताट दिसत असल्याचा दावा या व्हिडिओच्या आधारे करण्यात येत आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, मृत्यूचा दाखला मिळवण्यासाठी आलेल्या एका नागरिकाला बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली. रात्रभर थांबूनही दाखला न मिळाल्याने विलंबाचे कारण जाणून घेण्यासाठी तो संबंधित विभागात गेला. त्यावेळी तेथील दृश्य मोबाईलमध्ये चित्रित केल्याचे सांगण्यात येत आहे.
शवविच्छेदन विभागासारख्या संवेदनशील ठिकाणी अशा प्रकारचा आरोप समोर आल्याने रुग्णालयातील कामकाज आणि कर्मचाऱ्यांच्या जबाबदारीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
चौकशी करून कारवाई होणार का?
या प्रकरणातील व्हिडिओची सत्यता, संबंधित व्यक्तींची भूमिका आणि कथित मद्यपानाबाबत अधिकृत तपास होणे आवश्यक आहे. रुग्णालय प्रशासन या घटनेची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी ९८२२५४८४२९


66
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!