पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये रॅपिडो बाइक-टॅक्सीवर कारवाईचे निर्देश; रिक्षा-टॅक्सी चालकांना दिलासा


पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये रॅपिडो बाइक-टॅक्सीवर कारवाईचे निर्देश; रिक्षा-टॅक्सी चालकांना दिलासा

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात सुरू असलेल्या रॅपिडोच्या बाइक-टॅक्सी सेवेवर प्रशासनाने कारवाईचे निर्देश दिले आहेत. आवश्यक परवाना नसताना सेवा सुरू असल्याच्या कारणावरून पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ही सेवा तातडीने थांबवण्यास सांगितले आहे.
रिक्षा व टॅक्सी चालक संघटनांनी या सेवेच्या वैधतेबाबत तक्रारी केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत विनापरवाना बाइक-टॅक्सी सेवा सुरू असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यानंतर प्रशासनाने सेवा थांबवण्याचे निर्देश दिले.
या निर्णयामुळे रिक्षा व टॅक्सी चालकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होते का आणि कंपनीकडून त्याचे पालन केले जाते का, याकडे लक्ष लागले आहे.

प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी ९८२२५४८४२९


66
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!