एसटी कर्मचाऱ्यांचा ६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संपाचा इशारा!


एसटी कर्मचाऱ्यांचा ६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संपाचा इशारा!

१५ हजारांचा बोनस, ६० टक्के महागाई भत्त्यासह विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र

पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संप पुकारण्याचा इशारा देण्यात आला आहे. १५ हजार रुपये बोनस, ६० टक्के महागाई भत्ता, सातव्या वेतन आयोगानुसार वेतन करार आणि कॅशलेस वैद्यकीय सुविधा या प्रमुख मागण्या मान्य न झाल्यास संपाचे हत्यार उपसण्यात येणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटनेने यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अधिकृत पत्र दिले आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे.
संप झाल्यास एसटी वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे आता कर्मचाऱ्यांसह प्रवाशांचेही लक्ष लागले आहे. मागण्यांवर तोडगा न निघाल्यास ६ नोव्हेंबरपासून राज्यातील एसटी वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी ९८२२५४८४२९


66
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!