मोशी येथील कचरा आता निगडी स्मशान भूमी मागे – सचिन काळभोर 


मोशी येथील कचरा आता निगडी स्मशान भूमी मागे – सचिन काळभोर

निगडी अमरधाम स्मशान भूमी पाठीमागे पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी मोशी कचरा डेपो येथील ओला व सुका कचरा गोळा करून स्मशान भूमी पाठीमागे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील जागेमध्ये टाकण्यात येत असून त्या मुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत असून पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी ताबडतोब दखल घेऊन निगडी स्मशान भूमी पाठीमागे कचरा टाकण्यात येवू नये अमरधाम स्मशान भूमी ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरीक अंत्यसंस्कार करण्यासाठी उपस्थित राहत असून त्या ठिकाणी आजूबाजूला सेक्टर 22 मधील नागरिकांना तसेच अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या नागरिकांना विनाकारण उग्र वास सहन करावा लागत असून सध्या पावसाचे दिवस असून घाणीचे साम्राज्य पसरले असून त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी ताबडतोब दखल घेऊन मोशी कचरा डेपो येथील कचरा निगडी येथील अमरधाम स्मशान भूमी ह्या ठिकाणी टाकण्यात येवू नये अन्यथा पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त ह्यांच्या कार्यालय ह्या ठिकाणी कचरा टाकून आंदोलन करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी सचिन काळभोर भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता पिंपरी चिंचवड शहर

प्रतिनिधी विजय अडसूळ


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!