भोसरीच्या दीपक सिद्धार्थ पवारची नीट परीक्षेत देशात १२ वी रँक; मागास प्रवर्गात उल्लेखनीय यश


भोसरीच्या दीपक सिद्धार्थ पवारची नीट परीक्षेत देशात १२ वी रँक; मागास प्रवर्गात उल्लेखनीय यश

भोसरी, पुणे : भोसरी येथील रहिवासी दीपक सिद्धार्थ पवार याने २०२६ च्या नीट (NEET) परीक्षेत मागास प्रवर्गातून देशात १२ वा क्रमांक मिळवत भोसरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. दीपकला ७०० पैकी ६६८ गुण मिळाले असून त्याच्या या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

वडील सिद्धार्थ पवार यांचे आपल्या मुलाने डॉक्टर व्हावे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दीपकने गेली तीन वर्षे सातत्याने आणि जिद्दीने अभ्यास केला. कठोर परिश्रम, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले.

दीपकच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे भोसरीचे नाव राष्ट्रीय स्तरावर झळकले असून परिसरातील नागरिक, शिक्षक, मित्रपरिवार आणि विविध सामाजिक संघटनांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
विजय अडसूळ प्रतिनिधी


46
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!