उच्च शिक्षणातील संशोधनाला चालना; ‘सी.एम. सृष्टी’ योजना राबविण्यास मंजुरी


उच्च शिक्षणातील संशोधनाला चालना; ‘सी.एम. सृष्टी’ योजना राबविण्यास मंजुरी

मुंबई : राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, संशोधन आणि नवकल्पनांना चालना देण्यासाठी ‘सी.एम. सृष्टी’ योजना राबविण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
‘CM SRISTHI’ म्हणजेच Scheme for Research, Innovations and Technological Hubs in Higher Education Institutions या योजनेंतर्गत उच्च शिक्षण संस्थांमध्ये संशोधन, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांसाठी आवश्यक सुविधा व वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे.
राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय उच्च व तंत्रशिक्षण संस्था, शासकीय तंत्रनिकेतने यांच्यामार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे. यामध्ये रसायन तंत्रज्ञान संस्था (ICT), मुंबई, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे-रायगड यांचाही समावेश आहे.
या योजनेमुळे विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना नव्या तंत्रज्ञानावर काम करण्यासाठी तसेच संशोधन व नवकल्पनांना प्रत्यक्ष स्वरूप देण्यासाठी अधिक संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येणार आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!