टाकळीभान येथे मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर; ३७५ नागरिकांनी घेतला लाभ

टाकळीभान, प्रतिनिधी : प्रवरा मेडिकल ट्रस्ट, माजी सभापती नानासाहेब पवार प्रतिष्ठान, टाकळीभान विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी आणि टाकळीभान ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने टाकळीभान येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचा ३७५ नागरिकांनी लाभ घेतला.
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित या शिबिराचे उद्घाटन माजी सभापती नानासाहेब पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अशोक कारखान्याचे माजी संचालक भाऊ थोरात, माजी सरपंच चित्रसेन रणनवरे, रमेशदादा धुमाळ, उपसरपंच कान्हा खंडागळे, टाकळीभान सोसायटीचे चेअरमन राहुल पटारे, माजी चेअरमन एकनाथ पटारे, युवानेते भाऊसाहेब पवार, सुधीर मगर, भाजपाचे नारायण काळे, मुकुंद हापसे, अक्षय कोकणे, अनिल दाभाडे, संजय पवार, नानासाहेब लेलकर, विलास सपकाळ, बाळासाहेब शेळके तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राम बोरुडे आदी उपस्थित होते.
या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच रुग्णांना मोफत औषधोपचार देण्यात आले. शिबिरस्थळी पात्र नागरिकांसाठी ‘आयुष्मान भारत कार्ड’ काढण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली.
या शिबिरासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रवरा मेडिकल ट्रस्टचे चेअरमन डॉ. राजेंद्र विखे पाटील यांचे सहकार्य लाभले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. सुरेश जगदाळे (अधीक्षक), डॉ. विठ्ठलराव विखे पाटील प्रवरा ग्रामीण रुग्णालय, लोणी येथील डॉ. विलास घुले (प्रशासकीय अधिकारी), जोसेफ मकासरे (मेडिकल सोशल वर्कर), डॉ. राहुल सिद्धेय, डॉ. स्वप्नील हंबड, डॉ. शार्दुल गवांडे आणि डॉ. समृद्धी शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर




