अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दिलासा; ‘पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम’ योजनेच्या भत्त्यात सुधारणा
मुंबई : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देणाऱ्या ‘पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम’ योजनेतील भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
शिक्षणाच्या काळात विद्यार्थ्यांना येणाऱ्या विविध खर्चासाठी या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य दिले जाते. भत्त्यांमध्ये करण्यात येणाऱ्या सुधारणेमुळे अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या अधिक आधार मिळण्याची अपेक्षा आहे.
आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होऊ नयेत तसेच त्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी राज्य सरकारकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत.
‘पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम’ योजनेतील भत्त्यांमध्ये सुधारणा हा त्याचाच एक भाग असून, या निर्णयाचा लाभ पात्र अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना होणार आहे.
या निर्णयाला आदिवासी विकास विभागाच्या प्रस्तावानुसार मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी





