सावरकर इंडिया हाऊस राष्ट्रीय स्मारकासाठी हिंदू महासभेचे मंत्री आशिष शेलार यांना निवेदन
मुंबई / पुणे:
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या लंडन येथील निवासस्थानाची खरेदी करून तेथे ‘राष्ट्रीय स्मारक’ उभारण्याच्या कामाला गती मिळावी, यासाठी अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीने माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांना निवेदन देण्यात आले.
आमदार सौ. देवयानी फरांदे यांच्या निवेदनानुसार १२ नोव्हेंबर २०२५ रोजी या राष्ट्रीय स्मारकाबाबत बैठक घेण्यात आली होती. तसेच मंत्री आशिष शेलार यांनी स्वतः इंडिया हाऊसला भेट देऊन लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती दिली होती. याच पार्श्वभूमीवर लंडनमध्ये वास्तव्यास असलेले संकेत कुलकर्णी, मकरंद करंजीकर आणि हिंदू महासभेचे पदाधिकारी यांनी एकत्रित येऊन ‘सावरकर इंडिया हाऊस समिती’ स्थापन केली आहे. या समितीच्या माध्यमातून तेथील कागदपत्रांची पूर्तता आणि पाठपुरावा केला जात आहे. तसेच पुणे व लंडन येथे समांतर वास्तव्यास असलेले MIT चे डायरेक्टर सुजित धर्मपात्रे यांचेही यासाठी पूर्ण सहकार्य लाभत आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही यासंदर्भात निवेदन देण्यात आले असून, राज्य सरकारने या विषयावर त्वरित बैठक घेऊन पुढील कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या कामासाठी लंडनधून जे काही सहकार्य लागेल ते हिंदू महासभा उपलब्ध करून देईल, असेही निवेदनात नमूद केले आहे.
हे निवेदन हिंदू महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष आनंद दवे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. यावेळी हिंदू महासभेचे आनंद दवे, विवेक परदेशी, नितीन शुक्ल, उमेश कुलकर्णी, निखिल गोरडे अजय कांबळे आणि मिलिंद लावणकर उपस्थित होते.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429





