मुंबई : माहीम पोलीस वसाहतीतील इमारत क्रमांक १८ ला आग; अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू
मुंबई : मुंबईतील माहीम पोलीस वसाहतीतील इमारत क्रमांक १८ मध्ये आज आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
प्रतिनिधी सिंथिया कोरिया
Views: 48








