जनसेवा सप्ताहानिमित्त थेरगावात आयुष्यमान भारत कार्ड शिबीर; ४०० ज्येष्ठ नागरिकांना लाभ


जनसेवा सप्ताहानिमित्त थेरगावात आयुष्यमान भारत कार्ड शिबीर; ४०० ज्येष्ठ नागरिकांना लाभ

थेरगाव (प्रतिनिधी):
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘जनसेवा सप्ताह’ अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने थेरगाव येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. श्रीकृष्ण कॉलनीतील स्वामी समर्थ मंदिर परिसरात पार पडलेल्या या शिबिराचा सुमारे ४०० ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला.
या शिबिरामध्ये पात्र ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड काढून देण्यात आले. या उपक्रमाचे ज्येष्ठ नागरिकांनी स्वागत करत आयोजकांचे कौतुक केले.
या उपक्रमाचे नियोजन मा.नगरसेवक सतीश दरेकर, ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष अविनाश कुलकर्णी, सरचिटणीस गणेश भिगवणकर आणि उद्योग आघाडी सेलचे उपाध्यक्ष उदय कुलकर्णी यांच्या पुढाकाराने करण्यात आले.
यावेळी आयोजकांनी सांगितले की, अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत जनसेवेचे कार्य तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा जनसेवा सप्ताहाचा प्रमुख उद्देश आहे. आगामी काळातही नागरिकांच्या हितासाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार आहेत.
या शिबिराला थेरगाव व परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सौरभ लष्कर यांनी मोलाचे सहकार्य केले.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!