मुंबईत सरकारचा नवा पत्ता; एअर इंडिया इमारतीच्या २३व्या मजल्यावर असणार मुख्यमंत्र्यांचे कार्यालय


मुंबईत सरकारचा नवा पत्ता; एअर इंडिया इमारतीच्या २३व्या मजल्यावर असणार मुख्यमंत्र्यांचे कार्यालय

मुंबई:मुं बईतील नरिमन पॉइंट येथील ऐतिहासिक एअर इंडिया इमारत आता महाराष्ट्र सरकारच्या नव्या प्रशासकीय केंद्राच्या रूपात विकसित केली जात आहे. राज्य सरकारने ही २३ मजली इमारत सुमारे ₹१,६०१ कोटींना खरेदी केली असून, सध्या तिचे नूतनीकरण आणि आधुनिकीकरणाचे काम वेगाने सुरू आहे.

नूतनीकरणानंतर इमारतीच्या २३व्या मजल्यावर मुख्यमंत्री कार्यालय (CMO) उभारले जाणार असून, समुद्राकडे तोंड असलेले अत्याधुनिक ‘सी-फेसिंग’ कार्यालय तयार केले जात आहे. तसेच २२व्या मजल्यावर आधुनिक कॅबिनेट हॉल विकसित करण्यात येत असून, मंत्रिमंडळाच्या बैठका आणि महत्त्वाच्या शासकीय बैठका येथे आयोजित करण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

या इमारतीत मंत्रालयाबाहेर विविध ठिकाणी भाडेतत्त्वावर कार्यरत असलेले अनेक शासकीय विभाग स्थलांतरित करण्यात येणार आहेत. त्यामुळे विविध विभाग एकाच छताखाली कार्यरत राहतील, प्रशासनातील समन्वय वाढेल आणि सरकारचा दरमहा होणारा कोट्यवधी रुपयांचा भाडेखर्चही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे प्रशासकीय कामकाज अधिक कार्यक्षम आणि गतिमान होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429


45
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!