लोहगडावर सिगारेट ओढणाऱ्या पर्यटकांना स्थानिकाचा जाब; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
पुणे:
पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावर सिगारेट ओढत असल्याचा आरोप असलेल्या काही पर्यटकांना एका स्थानिकाने जाब विचारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये संबंधित स्थानिक पर्यटकांना, “हा किल्ला आमच्यासाठी मंदिरासारखा आहे. येथे सिगारेट ओढण्याची अक्कल नाही का?” असे म्हणत संताप व्यक्त करताना दिसत आहे. तसेच पर्यटकांकडील सिगारेट काढून घेत पोलिसांकडे तक्रार करण्याचा इशाराही दिल्याचे व्हिडिओमध्ये दिसते.
या घटनेनंतर ऐतिहासिक आणि वारसा स्थळांवरील पर्यटकांच्या वर्तनाबाबत, स्वच्छता, शिस्त आणि सांस्कृतिक वारशाचा आदर राखण्याबाबत सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी स्थानिकाच्या भूमिकेचे समर्थन केले असून, अशा ठिकाणी धूम्रपान आणि असभ्य वर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429







