राहुल गांधींवर चंद्रकांत पाटील यांचा निशाणा; “दगडफेकीतील प्रत्येक दगड उचललाय, फिंगरप्रिंटची तपासणी होणार”


राहुल गांधींवर चंद्रकांत पाटील यांचा निशाणा; “दगडफेकीतील प्रत्येक दगड उचललाय, फिंगरप्रिंटची तपासणी होणार”
मुंबई / नवी दिल्ली:
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले की, दिल्लीतील दगडफेकीच्या घटनेचा तपास अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने केला जात आहे. घटनास्थळावरील प्रत्येक दगड जप्त करण्यात आला असून त्यावरील फिंगरप्रिंट्सची तपासणी केली जाणार आहे. तपासातून सत्य समोर येईल, असा दावा त्यांनी केला.
यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधत, या प्रकरणात राहुल गांधी आणि पोलिस या दोघांनाही आपापले दावे तपास यंत्रणेसमोर किंवा न्यायालयात सिद्ध करावे लागतील, असे सांगितले.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी. 9822548429


45
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!