श्री वरद कम्प्युटर्सला एमकेसीएलचा उत्कृष्ट संगणक प्रशिक्षण संस्थेचा पुरस्कार


श्री वरद कम्प्युटर्सला एमकेसीएलचा उत्कृष्ट संगणक प्रशिक्षण संस्थेचा पुरस्कार

जालना, प्रतिनिधी महेंद्र बेराड : जालना येथील श्री वरद कम्प्युटर्स संस्थेला महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (MKCL) तर्फे “उत्कृष्ट संगणक प्रशिक्षण संस्था” हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या विभागीय बैठकीत एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे यांच्या हस्ते संस्थेचा गौरव करण्यात आला. यावेळी श्री वरद कम्प्युटर्सचे सहसंचालक सार्थक रामप्रसाद बैरागी यांनी पुरस्कार स्वीकारला.

या सन्मान सोहळ्यास एमकेसीएलचे पदाधिकारी बालकिशन बलवा, अतुल पतोडी, अमित रानडे आणि सिद्धार्थ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

या पुरस्कारामुळे श्री वरद कम्प्युटर्स संस्थेच्या गुणवत्तापूर्ण संगणक प्रशिक्षण कार्याला राज्यस्तरावर मान्यता मिळाली असून, जालना जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. संस्थेच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संचालक, सहसंचालक व संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे.


45
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!