मुंबईत दहीहंडीऐवजी रक्षाबंधनाची स्थानिक सुट्टी; २८ ऑगस्टला शासकीय कार्यालये बंद
मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांसाठी स्थानिक सुट्टीत बदल करण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या नव्या शुद्धीपत्रकानुसार, गोपाळकाला (दहीहंडी) ऐवजी आता रक्षाबंधनाच्या दिवशी, २८ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
ही सुट्टी केवळ मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय व निमशासकीय कार्यालयांना लागू राहणार आहे. त्यामुळे संबंधित कार्यालयांमध्ये २८ ऑगस्ट रोजी कामकाज बंद राहणार आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429
Views: 47






