श्रावणात भीमाशंकर मंदिर रात्री १० वाजेपर्यंत दर्शनाची खुले
श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. पहाटे ५ वाजता पूजा झाल्यानंतर भाविकांना रात्री १० वाजेपर्यंत दर्शन घेता येणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून दर्शनाच्या वेळेवर असलेल्या मर्यादा हटवण्यात आल्याने श्रावणातील शिवभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता दर्शन व्यवस्था आणि गर्दीचे नियोजन करण्यासही यामुळे मदत होणार आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429
Views: 29






