पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्वातंत्र्य दिनाची जय्यत तयारी!.


पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्वातंत्र्य दिनाची जय्यत तयारी!

पिंपरी-चिंचवड, दि. १४ ऑगस्ट २०२६ : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

महापालिकेच्या विद्युत विभागामार्फत मुख्य प्रशासकीय इमारतीवर तिरंग्याच्या रंगसंगतीत सुंदर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी ही रोषणाई अधिक खुलून दिसत असून, तिरंग्याच्या रंगांनी उजळलेले महापालिका भवन नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. या रोषणाईमुळे शहराच्या मध्यवर्ती भागात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.

स्वातंत्र्य दिन हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा दिवस आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचा संकल्प या दिवशी केला जातो.

महापालिका भवनावरील आकर्षक विद्युत रोषणाईमुळे स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहात आणखी भर पडली असून, नागरिकांमध्येही देशभक्तीची भावना जागृत होत आहे.

या स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रत्येक नागरिकाने राष्ट्रहित, सामाजिक बांधिलकी, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि शहराच्या विकासासाठी योगदान देण्याचा संकल्प करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

स्वातंत्र्याचा अभिमान… राष्ट्राच्या प्रगतीचा संकल्प!

प्रतिनिधी:  शाम शिरसाठ पुणे


44
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!