डी. डी. एस. पी. ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना सायबर क्राईमविषयी मार्गदर्शन


डी. डी. एस. पी. ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना सायबर क्राईमविषयी मार्गदर्शन

*एरंडोल, जि. जळगाव :* डी. डी. एस. पी. ज्युनिअर कॉलेज, एरंडोल येथे विद्यार्थ्यांसाठी सायबर क्राईम आणि सायबर सुरक्षेविषयी जनजागृतीपर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. डिजिटल माध्यमांचा वाढता वापर लक्षात घेता विद्यार्थ्यांनी ऑनलाइन व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमात बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थिनी **कुमारी स्नेहल पाटील** व **कुमारी वैष्णवी पाटील** यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार समजावून सांगितले. सोशल मीडिया अकाउंट सुरक्षित ठेवणे, अनोळखी लिंकवर क्लिक न करणे, OTP व पासवर्ड कोणालाही न सांगणे, QR कोडच्या माध्यमातून होणारी फसवणूक टाळणे तसेच ऑनलाइन फसवणूक झाल्यास तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याबाबत माहिती देण्यात आली.

यावेळी **AI Voice Scam** द्वारे होणाऱ्या फसवणुकीबाबत विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले. ओळखीच्या व्यक्तीचा आवाज हुबेहुब तयार करून पैशांची मागणी करणारे फोन किंवा मेसेज आल्यास त्यावर तात्काळ विश्वास न ठेवता संबंधित व्यक्तीशी संपर्क साधून खात्री करावी, असे सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनीही विविध प्रश्न विचारून या विषयाची माहिती जाणून घेतली.

कार्यक्रमाला कॉलेजमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिनिधी सोमेश मुळे

 


44
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!