पुणे एसीबीचे पोलीस हवालदार जगदीश विठ्ठल कस्तुरे यांना मानाचे ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर


​पुणे एसीबीचे पोलीस हवालदार जगदीश विठ्ठल कस्तुरे यांना मानाचे ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर

​विशेष प्रतिनिधी | पुणे
​महाराष्ट्र पोलीस दलात उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवा बजावल्याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), पुणे येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार जगदीश विठ्ठल कस्तुरे यांना स्वातंत्र्यदिनाच्या (१५ ऑगस्ट २०२६) पूर्वसंध्येला मानाचे ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर करण्यात आले आहे.
​गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांच्या दीर्घकालीन, उत्कृष्ट व निष्कलंक सेवेची दखल घेऊन हे पदक प्रदान केले जाते. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी १४ ऑगस्ट २०२६ रोजी जारी केलेल्या अधिकृत राजपत्रानुसार कस्तुरे यांच्यासह निवडक पोलिसांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
​दीर्घकालीन निष्कलंक सेवा आणि क्रीडा क्षेत्रातील प्राविण्य
​मूळचे शिंगोली (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथील रहिवासी असलेले जगदीश कस्तुरे हे सन २००६ मध्ये पोलीस दलात दाखल झाले. सध्या ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (अँटी करप्शन ब्युरो – ACB) पोलीस हवालदार म्हणून सेवा बजावत आहेत. पोलीस दलातील आपल्या सेवाकाळात त्यांनी अत्यंत उत्कृष्ट कामगिरी बजावत तब्बल १३२ विविध बक्षिसे पटकावली आहेत. याशिवाय क्रीडा क्षेत्रात, विशेषतः हॉकी या खेळात, त्यांनी राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करत प्राविण्य मिळवले आहे.
​दीर्घकालीन व निष्कलंक गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल मिळालेल्या या बहुमानाबद्दल पोलीस महासंचालकांनी पदक प्राप्त सर्व अंमलदारांचे मनःपूर्वक अभिनंदन करून भावी सेवेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कस्तुरे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल पोलीस वर्तुळातून तसेच त्यांच्या शिंगोली गावातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429


44
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!