कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षाचालकांचे आंदोलन; वाहतूक कोंडी
मुंबई : कांदिवली लिंक रोडवर मराठी भाषेच्या सक्तीच्या विरोधात काही रिक्षाचालकांनी रिक्षा रस्त्यावर थांबवत आंदोलन सुरू केल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. गेल्या सुमारे २० मिनिटांपासून लिंक रोडवरील वाहतुकीचा वेग मंदावला असून प्रवासी आणि वाहनचालकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
प्रवासी घेऊन जाणाऱ्या काही ऑटो रिक्षाचालकांना धमकावल्याचा आरोपही करण्यात येत आहे. तसेच काही अमराठी रिक्षाचालकांनी आंदोलन करत रस्ता अडवल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
ही बातमी प्राथमिक माहितीनुसार असून, आंदोलनामागील नेमके कारण आणि पोलिसांची अधिकृत भूमिका स्पष्ट होणे बाकी आहे.
प्रतिनिधी सिंथिया कोरिया मुंबई






