निसर्गोपचार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दिलीप काटोले यांचा ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्काराने सन्मान
पारध/प्रतिनिधी महेंद्र बेराड: निसर्गोपचार, योग आणि समग्र आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजामध्ये आरोग्य जनजागृती निर्माण करणारे जालना येथील निसर्गोपचार तज्ज्ञ दिलीप संपत काटोले यांची ‘उत्कृष्ट निसर्गोपचार तज्ञ महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२६’ या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित राज्यस्तरीय निसर्गोपचार सेमिनार व पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र निसर्गोपचार ऑर्गनायझेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यात महाराष्ट्र शासनाचे मंत्री अतुलजी सावे यांच्या हस्ते दिलीप काटोले यांचा सन्मान करण्यात आला.
निसर्गोपचाराच्या माध्यमातून आरोग्यविषयक जनजागृती, रुग्णसेवा तसेच योग व नैसर्गिक उपचारपद्धतीचा समाजामध्ये प्रसार करण्यासाठी काटोले यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यांच्या कार्यामुळे परिसरातील नागरिकांना नैसर्गिक व समग्र आरोग्यविषयक उपचारांबाबत मार्गदर्शन मिळत आहे.
या सन्मानाबद्दल दिलीप संपत काटोले यांचे विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार, बारी समाज बांधव, अखिल भारतीय बारी समाज महासंघाचे पदाधिकारी व गावातील सर्व नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील आरोग्यसेवेच्या वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
प्रतिनिधी महेंद्र बेराड






