सत्तारांची भेट, तरीही जरांगे पाटील उपोषणावर ठाम; २९ ऑगस्टपासून आंदोलन


सत्तारांची भेट, तरीही जरांगे पाटील उपोषणावर ठाम; २९ ऑगस्टपासून आंदोलन

विशेष प्रतिनिधी | मुंबई
कुणबी प्रमाणपत्रे रद्द होत असल्याचा आरोप करत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून आमरण उपोषण करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. आमदार अब्दुल सत्तार यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन सरकार आरक्षणाच्या मुद्द्यावर सकारात्मक असल्याचे सांगत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.
मात्र, जरांगे पाटील यांनी ही विनंती नाकारत सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली. समाजाच्या प्रश्नांवर सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अशी भूमिका घेत त्यांनी मुंबईतील ‘वर्षा’ बंगल्यावर आंदोलन करण्याचा इशारा कायम ठेवला आहे.
दरम्यान, सत्तार यांच्या मध्यस्थीनंतरही जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने आगामी काळात सरकार आणि आंदोलकांमध्ये पुन्हा चर्चा होण्याची शक्यता आहे.
प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!