साखरेनंतर कांद्याने रडवले; दरवाढ रोखण्यासाठी ‘कांदा एक्सप्रेस’ धावली


साखरेनंतर कांद्याने रडवले; दरवाढ रोखण्यासाठी ‘कांदा एक्सप्रेस’ धावली

विशेष प्रतिनिधी | नाशिक
देशभरात कांद्याच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर ताण वाढत असताना केंद्र सरकारने कांद्याचा पुरवठा वाढवण्यासाठी ‘कांदा एक्सप्रेस’ सुरू केली आहे. महाराष्ट्रातील नाशिक येथून कांद्याचा बफर स्टॉक रेल्वे रॅकद्वारे देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये पाठवला जात आहे.
दिल्ली, चेन्नई, कोलकाता, गुवाहाटी यांसह कांद्याची मागणी जास्त असलेल्या शहरांमध्ये हा साठा पोहोचवला जाणार आहे. सरकारच्या या निर्णयाचा उद्देश बाजारातील कांद्याचा पुरवठा वाढवून वाढत्या किमतींवर नियंत्रण मिळवणे हा आहे.
सरकारकडून निवडक शहरांमध्ये बफर स्टॉकमधील कांदा किलोमागे ३५ रुपये या नियंत्रित दराने उपलब्ध करून देण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात कांद्याच्या वाढलेल्या दरातून ग्राहकांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, कांद्याच्या वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर सरकारने घेतलेल्या या निर्णयाकडे ग्राहक आणि बाजारपेठेचे लक्ष लागले आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!