वाघोलीत वादाचा शेवट हत्येत; सफाई कर्मचाऱ्याचा सहकाऱ्याने घेतला जीव
विशेष प्रतिनिधी | पुणे
वाघोलीतील आव्हाळवाडी परिसरात किरकोळ वादातून सफाई कर्मचाऱ्याची सहकाऱ्याने हत्या केल्याची घटना घडली. धीरेंद्र पासवान (३७) असे मृताचे नाव असून ते मूळचे गोरखपूर, उत्तर प्रदेश येथील रहिवासी होते.
मध्यरात्री दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. यावेळी संशयित आरोपी सुनीलकुमार याने धीरेंद्र यांच्या डोक्यात कठीण वस्तूने वार केल्याचे सांगण्यात येत आहे. यात त्यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, वाघोली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 982254829
Views: 27





