पिंपरी-चिंचवडमध्ये ३० ऑगस्टला शिवसेनेतर्फे भव्य नोकरी मेळावा; ५० हून अधिक कंपन्या सहभागी होणार
पिंपरी-चिंचवड : शहरातील तरुण-तरुणींसाठी रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली असून, रविवार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी शिवसेनेतर्फे भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या नोकरी मेळाव्यात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील ५० हून अधिक नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. विविध क्षेत्रांमधील रोजगाराच्या संधी एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
मेळाव्याचे ठिकाण व वेळ :
📅 दिनांक : रविवार, ३० ऑगस्ट २०२६
⏰ वेळ : सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत
📍 स्थळ : चिंचवडे लॉन्स अँड बँक्वेट हॉल, आदित्य बिर्ला हॉस्पिटल रोड, चिंचवड गाव, पिंपरी-चिंचवड.
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींनी आपला अपडेटेड बायोडाटा (Resume) सोबत घेऊन या मेळाव्यास उपस्थित राहावे आणि रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी व संपर्कासाठी ७३९१९६६२९५ / ९५११९१०५९५ / ९५११९१०३५० या क्रमांकांवर संपर्क साधावा.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429





