समाजप्रबोधनपर कीर्तनातून ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली शेलुदकर यांनी दिला व्यसनमुक्तीचा संदेश*


*समाजप्रबोधनपर कीर्तनातून ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली शेलुदकर यांनी दिला व्यसनमुक्तीचा संदेश*

पारध शाहूराजे, (प्रतिनिधी महेंद्र बेराड) /दिनांक 26/08/2026 :- पारध शाहूराजे येथील श्री पराशर महाराज संस्थान येथील सभागृहात आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून,दररोज काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, भागवत कथा, हरिपाठ, भजन,कीर्तन यासह विविध धार्मिक व समाजप्रबोधनपर कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित समाजप्रबोधनपर कीर्तनात ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज शेलुदकर यांनी व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश दिला. दारू, तंबाखू, गुटखा व इतर व्यसनांमुळे व्यक्तीचे आरोग्य, कुटुंब आणि समाजावर होणारे दुष्परिणाम त्यांनी आपल्या ओघवत्या कीर्तनातून उपस्थितांसमोर मांडले.

“व्यसनापासून दूर राहून संतविचारांचा स्वीकार करा आणि निरोगी, सुसंस्कृत समाजाच्या निर्मितीसाठी प्रत्येकाने व्यसनमुक्तीचा संकल्प करावा,” असा संदेश त्यांनी कीर्तनातून दिला. त्यांच्या प्रभावी,विनोदी समाजप्रबोधनपर कीर्तनाला उपस्थित भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कीर्तनानंतर श्री संदीप भाऊ क्षीरसागर यांच्या हस्ते महेंद्र बेराड यांना ‘ज्ञानेश्वरी गाथा’ ही भगवंताची कृपारूपी अनमोल भेट देण्यात आली. हा क्षण अत्यंत आनंदाचा व अविस्मरणीय असल्याची भावना महेंद्र बेराड यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमास भागवत कथा वाचक ह.भ.प. विष्णु महाराज सास्ते, श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज शेलुदकर, अखिल भारतीय वारकरी संघाचे तालुकाध्यक्ष अंबादास महाराज लोखंडे, सर्व टाळकरी,भजनी मंडळी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

यावेळी माजी पंचायत समिती सभापती परमेश्वर पाटील लोखंडे, माजी सरपंच गणेश पाटील लोखंडे, पंचायत समिती सदस्य गणेश दादा लोखंडे, संग्रामराजे देशमुख सर, रवी सर लोखंडे, शरद आबा देशमुख, श्याम दादा देशमुख, संतोष पाखरे, सुरेश महाराज देशमुख, समाधान बाबा, नारायण बडनेरे, अमोल शेठ बडनेरे, अक्षय लोखंडे सर, सागर देशमुख, दत्ता पा.लोखंडे, गणेश तेलंग्रे, गणेश जहागीरदार, सांडू पाटील लोखंडे, विठ्ठल लोखंडे, प्रवीण महाराज लोखंडे व गोपाल महाराज लोखंडे यांच्यासह बहुसंख्येने भाविक भक्त, गावकरी मंडळी, महिला वर्ग तसेच बालक वर्ग उपस्थित होता.

यावर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे 26 वे वर्ष असून अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने पारध शाहूराजे गावात ‘राम कृष्ण हरी’च्या नामघोषासह संतविचार, समाजप्रबोधन आणि व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्यात येत असून, या सप्ताहास गावातील भाविक भक्तांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून गावात भक्तीमय वातावरण तयार झाले आहे.


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!