श्रीकाशी विद्वद्धर्म परिषदेच्या वतीने महंत डॉ. अनिकेत शास्त्री महाराजांचा विशेष गौरव


श्रीकाशी विद्वद्धर्म परिषदेच्या वतीने महंत डॉ. अनिकेत शास्त्री महाराजांचा विशेष गौरव

नाशिकरोड : सनातन धर्म, संस्कृती आणि वैदिक परंपरांच्या संवर्धनासाठी सातत्याने कार्य करणारे महंत डॉ. अनिकेत शास्त्री महाराज यांचा उत्तर प्रदेशातील काशी येथे श्रीकाशी विद्वद्धर्म परिषदेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी वेद विभागात सुरू असलेल्या पाक्षिक वैदिक प्रयोग यज्ञाची पूर्णाहुती तसेच प्रतिष्ठित विप्र व विद्वत् पूजन डॉ. अनिकेत शास्त्री महाराज यांच्या हस्ते पार पडले. वैदिक परंपरा, यज्ञ, तप, अनुष्ठान, साधना आणि संस्कारांच्या प्रसारासाठी त्यांच्या सुरू असलेल्या कार्याची दखल घेत हा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास श्रीकाशी विद्वद्धर्म परिषदेचे अध्यक्ष पं. छोटेलाल त्रिपाठी, कार्यकारी अध्यक्ष पं. कमलाकांत त्रिपाठी यांच्यासह विविध मान्यवर व विद्वतजन उपस्थित होते. यावेळी डॉ. अनिकेत शास्त्री महाराज यांच्या धार्मिक व सांस्कृतिक कार्याचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429


49
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!