टाकळीभान टेलटैंक (गोविंदसागर) पूर्ण क्षमतेने भरला .


टाकळीभान टेलटैंक (गोविंदसागर) पूर्ण क्षमतेने भरला

टाकळीभान (प्रतिनिधी)-श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीमानसह परिसरातील गावांना वरदान ठरलेला टाकळीभान टेलटैंक (गोविंदसागर) पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे ग्रामस्थांसह शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. टेलटैंक पूर्ण क्षमतेने भरुन, सांडव्यातील पाणी आता पाहार तलावाकडे झेपावले आहे. लवकरच पाझर तलावही भरला जाणार आहे.

 

टाकळीभानतेल त्यांची साठवण क्षमता९७२ च्या दुष्काळात माजी कृषी मंत्री दिवंगत गोविंदराव आदिक यांच्या प्रयत्नांतून टाकळीमान टेलटॅकची निर्मिती झाली आहे. पटेलटॅकला स्वतःचा पाण्याचा स्त्रोत नसल्यामुळे भंडारदरा धरणाच्या ओव्हरफ्लोच्या प्राण्यातून कालव्याद्वारे भरण्याची तरतूद केली आहे. टेलटॅकला सिंचनासाठी कालवा आहे. या कालव्याद्वारे टाकळीमानचा काही भाग व घोगरगावमधील काही भागातील शेती सिंचनाखाली आली आहे.

टेलटॅकची साठवण क्षमता १२७दशलक्ष घनफुट आहे. टेलटँकच्या होणाऱ्या पाझरामुळे टाकळीमानसह परीसरातील ७ ते ८ गावांची शेती हिरवी होवून, परिसर सुजलाम् सुफलाम् झाला आहे. टेलर्टकजवळ

टाकळीभानसह परिसरातील सात आठ गावांच्या पाणी पुरवठा योजना आहेत. यामुळे या टेलटॅकच्या पाणी पातळीकडे परीसराची नेहमी बारीक नजर राहते. जलसंपदा विभागालाही या टेलटॅकमुळे पाणीपट्टीच्या माध्यमातून महसूल मिळत असल्याने त्यांचेही पाणी पातळीकडे लक्ष असते.

धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्यामुळे भंडारदरा, निळवंडे धरणे तुडूंब भरली. यामुळे प्रवरानदी पात्रात ओव्हरफ्लोचे पाणी सोडल्यामुळे जलसंपदा कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वडाळा उपकार्यकारी अभियंता संजय कल्हापुरे यांच्या आदेशाने प्रवरा डावा कालव्यातून थेट टेलर्टकमध्ये टाकळीभान ओव्हरफ्लोचे पाणी सोडले होते. बेलपिंपळगाव शाखा अभियंता शंतनू मारवाडी, कालवा निरीक्षक अप्पासाहेब तनपुरे, मदतनिस विनोद साठे या जलसंपदा अधिकारी कर्मचाऱ्यांनी गेली २० दिवस टेलर्टक भरण्यासाठी परिश्रम घेतले. अखेर टाकळीभान टेलर्टेक पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे परीसरातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुलले आहे,

रब्बी हंगामी पिकांचे नियोजन आता परीसरातील शेतकऱ्यांना करता येणार आहे. टेलर्टक ओव्हरफ्लो झाल्यामुळे टाकळीभान परिसरातील शेतकऱ्यांनी जलसंपदा अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर


49
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!