वाकडमध्ये कौटुंबिक छळाला कंटाळून विवाहित महिलेची आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा
पुणे : वाकड परिसरात सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या कथित कौटुंबिक छळाला कंटाळून ३२ वर्षीय विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिल्पा सचिन गवारे असे मृत महिलेचे नाव आहे.
माहेरच्या संपत्तीतून हिस्सा आणावा, या कारणावरून सासरच्या मंडळींकडून शिल्पा यांचा छळ केला जात असल्याचा आरोप त्यांच्या भावाने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत केला आहे.
या तक्रारीवरून वाकड पोलिसांनी पती सचिन गवारे, सासरे आणि दीर अशा तिघांविरुद्ध हुंडाबळी व कौटुंबिक छळाच्या आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे.
रक्षाबंधनाच्या सणाच्या आदल्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रकरणाचा पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
Views: 106




